Tuesday, October 5, 2021

चित्रप्रश्नावली - आपल्या शाळेचा नवीन उपक्रम

सर्व वाली/पालकांना कळविण्यात येते की आपल्या नगर प्रा.शा.क्र.-२५५ द्वारे नवीन उपक्रम  सुरु करण्यात आला आहे - चित्रप्रश्नावली.

साधारणतः आपण प्रश्नावलीत ब-याच वेळा पाहत असतो की ज्यात बहुविकल्पीय उत्तरांचे प्रश्न असतात. विद्यार्थ्यांमध्ये ह्या प्रश्नावलीत भाग घेण्यात, पाहिजे तशी गोडी तसेच आवड निर्माण होत नाही.तसेच विद्यार्थी जास्तीत जास्त मूर्त वस्तु/संकल्पना विषयी माहितगार व्हावे यासाठी हा नावीन्यपुर्ण उपक्रम राबविण्यात आला आहे.सर्व वालींनी/पालकांनी आपल्या पाल्यांना ह्या प्रश्नावलीत सहभाग घेण्यास प्रोत्साहन द्यावे.ज्यामुळे त्यांच्या ज्ञानात वाढ होइल व अवांतर वाचनात रस निर्माण होइल.

जय भारत!

चित्रप्रश्नावली 1

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSc_14e7zC6gY-XQHeWmsbiz6JEpFXGWXkgEi-L6R6Cztr9B5g/viewform?usp=sf_link

चित्रप्रश्नावली 2

 https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfrjQqRn3w22Qag4N1Fw0sB2e60EjInegIu3PU3OnKTo55I_g/viewform?usp=sf_link

चित्रप्रश्नावली 3

https://docs.google.com/forms/d/15x1xmqp3IpoExgUxXJfiy8Mvz0ypUAkz5o-C_Jxf7po/edit?usp=drivesdk

चित्रप्रश्नावली 4

https://docs.google.com/forms/d/1Uy9CGWuf4zHw6vU-O8H7xSAJOHvDUJfTZYY9dvaXHDQ/edit?usp=drivesdk 

चित्रप्रश्नावली 5

https://docs.google.com/forms/d/1BOJmJM-uyAjJ4Fxl_MiNvT-7uyPOzy4rQuABb41Z0f8/edit?usp=drivesdk


चित्रप्रश्नावली 6

https://docs.google.com/forms/d/16HKShGdOXMVq8mx6GcA8B3FD1e25tnoamyZtJLGQlIA/edit?usp=drivesdk

चित्रप्रश्नावली 7 

https://docs.google.com/forms/d/1odH7FcJUpE3tQg-yJS8_1nRhRKk66eGJE1M40TtINtg/edit?usp=drivesdk




Tuesday, July 13, 2021

मे २०२१ ते जून २०२१ पर्यंतच्या घडामोडी

 १) आपल्या शाळेच्या गौरवात आणखी वाढ ☺-

             


     NMMS परीक्षेत आपल्या शाळेतील इ. ८ वी अ ची विद्यार्थीनी किर्ती सुनिल धकाते हीने १८० गुणांपैकी १२८ गुण प्राप्त करुन मेरीटमध्ये स्थान मिळविले.ह्यामुळे ह्या विद्यार्थीनीस इ. ९ ते १२ पर्यंत दरवर्षी १२०००/- स्कोलरशीप मिळेल अश्या प्रकारे ४ वर्षात एकुण ४८०००/- ची मातबर रक्कम शैक्षणिक सहाय म्हणून प्राप्त होईल.विद्यार्थीनी किर्ती सुनिल धकाते हीस शाळा परिवार तर्फे हार्दिक शुभेच्छा!

२) MICROSOFT TEAMS एप्लीकेशनवर ओनलाईन क्लासचे आयोजन-

शाळा बंद आहे पण शिक्षण नाही! ह्या वाक्याला सार्थक करण्यासाठी आपल्या शाळेतील सर्व शिक्षकांद्वारे नियमित ओनलाईन क्लासचे आयोजन दररोज करण्यात येत आहे. त्यात दररोज मोठ्या संख्येत विद्यार्थी जोइन होतात व ज्ञान प्राप्त करतात.अश्याप्रकारे सर्व वालींनी ओनलाईन क्लासला चांगला प्रतिसाद दिला आहे.जे विद्यार्थी अजुनही ओनलाईन क्लासला जोइन होत नाही त्यांच्या वालींनी देखील आपल्या पाल्यांना ओनलाईन क्लासमध्ये जोइन होण्यास प्रोत्साहन द्यावे.


३)ज्ञानसेतु ब्रिजकॉर्स-

गुजरात सरकार शिक्षण विभागाद्वारे मागच्या शैक्षणिक वर्षाच्या मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या निदान कसोटी वरुन शोधण्यात आलेले कठीण विषयबिंदुंचा पुन्हा सराव व्हावा यासाठी ज्ञानसेतु ब्रिजकोर्सचे आयोजन १०/०६/२०२१ पासुन ते १७/०७/२०२१ पर्यंत करण्यात आले आहे.ह्या कार्यक्रमांचे प्रसारण डी.डी. गिरनार चॅनलवर दररोज वेळापत्रक नुसार वेगवेगळ्या इयत्तेसाठी प्रसारण करण्यात येते तसेच युट्युबच्या लींक द्वारे देखील हे शैक्षणिक कार्यक्रम पाहु शकतो.
ह्या कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांचे मुल्यांकन करण्यासाठी ता-२०/०७/२१ ते २३/०७/२१ दरम्यान एकम कसोटी/सामयिक कसोटी घेण्यात येइल त्यामुळे सर्व वालींनी दररोज हे कार्यक्रम आपल्या पाल्यांना डी.डी. गिरनार चेनलवर दाखवावे.




✔   Gujarat e-Class Samagra Shiksha  ह्या युट्युब चॅनलवर देखील हे व्हीडीयो उपल्ब्ध आहेत. https://www.youtube.com/c/GujaratEclass/videos


४)विश्व वस्ती दिवस साजरा- 

विद्यार्थी वस्तीवाढच्या गंभीर समस्ये विषयी माहितगार होतील ह्या उद्देश्याने आपल्या शाळेत विश्व वस्ती दिवस निमित्ते  निबंध,चित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले ह्या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्साहाने भाग घेतला.














Thursday, April 22, 2021

इयत्ता १ ते ८ च्या विद्यार्थ्यांना मास प्रमोशन दिल्याबद्दल.....


                    इयत्ता 1 ते 8 च्या सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांना कळविण्यात येते की नगर प्राथमिक शिक्षण समितीच्या वरील परिपत्रकानुसार आपल्या शाळेत  शैक्षणिक वर्ष 2020-21 दरम्यान शिकत असलेल्या इयत्ता - 1 ते 8 च्या सर्व विद्यार्थ्यांना वरच्या वर्गात प्रवेश/ बढती /प्रमोशन देण्यात आले आहे.
               होम लर्निंगच्या विविध माध्यमांद्वारे शिक्षण कार्य चालु आहे आणि शाळेत जो पर्यंत नियमित प्रत्यक्ष शिक्षण कार्य चालु होत नाही तो पर्यंत विविध माध्यमांद्वारे ओनलाइन शिक्षण कार्य चालु राहील.तसेच विद्यार्थ्यांचे सतत मुल्यांकन कार्य सुद्धा चालु राहील.हे मुल्यांकन कार्य उपचारात्मक कार्यासाठी करण्यात येत आहे.सध्या कोणत्याही विद्यार्थ्यांना नापास करण्यात येणार नाही.
             सर्व वालींनी वरील सुचना वाचुन नोंध घ्यावी.


Monday, March 8, 2021

“TWINNING OF SCHOOLS” અહેવાલ

 


           આજે તા.//૨૦૨૧ ના રોજ “Twinning of schools” કાર્યક્રમ અંતર્ગત હાલમાં Covid-19 મહામારીને કારણે પ્રાથમિક શાળાઓમાં વિધાર્થીઓને શાળામાં બોલાવી શકાય તેમ હોવાથી ધો. થી સુધીના વિધાર્થીઓ માટે કાર્યક્રમનું ઓનલાઇન વર્ચ્યુઅલ પ્લેટફોર્મનાં માધ્યમથી આયોજન કરવામાં આવેલ હતું.

          અત્રેની શાળા ડૉ.સરોજીની બાબર નગર પ્રાથમિક શાળા ક્રમાંક – ૨૫૫ નાગસેન નગર પાંડેસરા સુરત માં તારીખ ૨/૩/૨૦૨૧ નાં રોજ TWINNING  પ્રોગ્રામ હાથ ધરવામાં આવ્યો. જેમાં બીજી શાળા સાથે TWINNING કરવાનું હતું તો આપણી શાળા એ શાળા ક્રમાંક – ૨૨૨ શ્રી દામોદર હરી ચાફેકર ન.પ્રા કુ.શાળા સાથે આ પ્રોગ્રામ યોજી માઇક્રોસોફ્ટીંગ નાં માધ્યમથી ધોરણ 6 થી ૮ નાં વિધાર્થીઓને જ્ઞાનનું આદાન-પ્રદાન કર્યું જેમાં ધોરણ 6 થી ૮ ની વિધાર્થીનીઓ દ્વારા વાર્તા કથન,અભિનય ગીત,યોગ નિદર્શન,સૂર્ય નમસ્કાર,કેલેન્ડરનો ઇતિહાસ,ગ્લોબલ વૉર્મિંગ, તામ્રપત્ર-ભોજપત્રની માહિતી,દેશભક્તિ ગીત વગેરે પ્રવૃત્તિ યોજાઈ. જેમાં કન્યા અને કુમાર આ TWINNING પ્રોગ્રામનું આનંદ માણ્યો.

           “Twinning of schools” કાર્યક્રમ માં બાળકોને ખુબજ મજા, ભયમુકત અને તણાવમુકત વાતવરણની અનુભુતિ થઇ છે. કાર્યક્રમ દ્વારા બાળકોમાં બૌધ્ધિક વિકાસ, વિવિધ કૌશલ્યો સારા એવા ગુણોની ભરમાર જોવા મળી હતી.

 

 

વિધાર્થીઓની સંખ્યા – ૫૦

શિક્ષકોની સંખ્યા – ૩

પ્રવૃત્તિઓ - વાર્તા કથન,અભિનય ગીત,યોગ નિદર્શન,સૂર્ય નમસ્કાર,કેલેન્ડરનો ઇતિહાસ,ગ્લોબલ વૉર્મિંગ, તામ્રપત્ર-ભોજપત્રની માહિતી,દેશભક્તિ ગીત.

Monday, March 1, 2021

आपल्या शाळेत साजरा करण्यात आला राष्ट्रीय विज्ञान दिवस .

   डॉ सरोजिनी बाबर नगर प्रा. कन्या शाळा क्र.255 नागसेननगर पांडेसरा येथे राष्ट्रीय विज्ञान दिवस -2021 साजरा करण्यात आला . हजर सर्व विद्यार्थी व शिक्षक उत्साहाने सहभागी झाले.विज्ञानाचे प्रयोग विद्यार्थ्यांनी करून दाखविले . प्रत्येक घटने मागे असलेल्या कारणांना वैज्ञानिक दृष्टिकोनाने पाहण्याचे कौशल्य प्राप्त केले. कार्यक्रमची व्हिडीयो लींक.

Sunday, February 28, 2021

राष्ट्रीय विज्ञान दिवस

महान वैज्ञानिक भौतिक शास्त्रज्ञ सर चंद्रशेखर वेंकट रामन यांनी २८ फेब्रुवारी १९२८ रोजी भौतिकच्या गंभीर विषयावर एक महत्त्वपूर्ण शोध लावला होता. पारदर्शी पदार्थ मधून जाणाऱ्या प्रकाशांचा किरणात बदल करणारा हा बदल रामन यांनी शोधून काढला. त्यामुळे त्यांना १९३० साली भौतिकमध्ये नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार मिळवणारे ते केवळ पहिले भारतीय नव्हते तर आशियातील पहिले व्यक्ती होते. हा शोध लावल्यानंतर त्यांच्या सन्मानार्थ १९८६ पासून देशभरात या दिवशी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. १९५४ साली भारत सरकारने त्यांना सर्वोच्च भारत रत्न पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला.
      आज २८ फेब्रुवारी रोजी संपूर्ण देशभरात राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो. देशाचे महान शास्त्रज्ञ सी. व्ही. रामन यांनी आजच्या दिवशी जी किमया केली होती. त्यामुळे त्यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. आज देशभरातील शाळा, महाविद्यालयात विज्ञान दिन साजरा केला जातो.
   शाळा नं.255 च्या विद्यार्थ्यांनी 01/03/21 च्या दिवशी प्रयोग निदर्शन, वैज्ञानिक जीवन परिचय, विज्ञान साहित्य प्रदर्शन, निबंध-वक्तृत्व स्पर्धेत सहभागी व्हावे. वर्गशिक्षकांनी ह्या स्पर्धांचे आयोजन करावे.

Friday, February 26, 2021

Twinning of Schools

इयत्ता 6 ते 8 च्या  सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की वरील परिपत्रकानुसार आपल्या शाळेचे  Twinning शाळा क्रमांक 222 सोबत करण्यात आले आहे. या कार्यक्रमात इयत्ता 6 ते 8 च्या  सर्व विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे . या कार्यक्रमात वर्ग शिक्षकांना त्यांच्या विषयाप्रमाणे विविध प्रवृत्ती देण्यात आलेले आहेत . या प्रवृत्ती ठरलेल्या दिवशी ऑनलाइन वर्च्युअल क्लास च्या माध्यमाने तुम्हाला सादर कराव्या लागतील . त्यामुळे शिक्षकांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही  प्रवृत्ति मध्ये भाग घ्यावा व आपल्या शाळेत करण्यात येणाऱ्या विविध प्रवृत्तींचे सादरीकरण करावे .
इयत्ता ६-८ च्या Twinning program मध्ये ऑनलाईन जोडल्या जाणाऱ्या मुलींचे नाव पुढील प्रमाणे आहेत. त्यांनी सोमवारी 01/03/2021 रोजी सकाळी  शाळा क्र.222 द्वारे पाठविण्यात येणाऱ्या लींक वरून जॉईन व्हावे.

DIKSHA | Platform for Teachers to Learn — Teach A Class

DIKSHA | Platform for Teachers to Learn — Teach A Class: DIKSHA is a platform for teachers to learn, created by the Indian government. It comes with lesson plans for teachers, self-learning modules for students. It is a great free tool for teacher continuous professional development (CPD). It has subject-wise resources, like for Maths, SST, English and Sc

Wednesday, February 24, 2021

ता-24/02/2021 दिवशी मान. कमिश्नरश्री व न.प्रा. शि. समितिचे मान.शासनाधिकारीश्रीच्या हजेरीत भरली बैठक SOP विषयी मार्गदर्शन संबधीत.

ता-24/02/2021 दिवशी मान. कमिश्नरश्रीच्या अध्यक्ष स्थानी व न.प्रा.शि. समितिचे मान.शासनाधिकारीश्रीच्या हजेरीत  सायन्सस सेंटर ,सुरत येथे संध्याकाळी 5:30 वाजता सुुरत शहरातील खाजगी व सरकारी शाळांच्या सर्व मुख्यशिक्षकांची  COVID-19 च्या SOP GUIDELINES विषयी समीक्षा बैठक आयोजित करण्यात आली होती ज्यात पुढील सूचना देण्यात आल्या .
1) ज्या विद्यार्थ्यांच्या घरी कोणी आजारी असेल (सर्दी,खोकला,ताप सारखे COVID-19 लक्षण असतील) अश्या विद्यार्थ्यांनी शाळेत येऊ नये.
2)प्रवास करून येणारे विद्यार्थीचे RAPID ANTIGEN TEST अवश्य करावे.
3) AC वर्ग असतील तरी  दरवाजे खिडक्या उघड्या ठेवावे. बंद रूममध्ये संक्रमण जास्त होऊ शकते.
4) पुढील कित्येक महिने सामूहिक प्रवृत्ती, खेळ इत्यादी बंद ठेवावे.
5) कॅन्टीन बंद ठेवावी. नाश्ता तसेच जेवण व्‍यक्तिगत करावे सामूहिक एकमेकांचे डब्यात खाऊ नये.
6) मास्क घातल्याशिवाय शाळेत प्रवेश देऊ नये.मास्क नही तो टोकेंगे, कोरोना को रोकेंगे.
7)जर एकही विद्यार्थी positive सापडला तर पूर्ण वर्ग 14 दिवस बंद राहील. तसेच Contact tracing करण्यात येईल.

तसेच परिपत्रात देण्यात आलेल्या SOP GUIDELINES चे काटेकोर पालन करावे.

Monday, February 22, 2021

प्रथम सत्रांत परीक्षा 2021, इयत्ता 3 री ते 8 वी.

इयत्ता 3 ते 8 च्या विद्यार्थी आणि पालकांना कळविण्यात येते की आपल्या पाल्यांची प्रथम सत्रांत परीक्षा खालील आयोजना प्रमाणे घेण्यात येणार आहे त्यामुळे सर्व पालकांनी प्रथम सत्राच्या अभ्यासक्रमाची तयारी आपल्या पाल्यांकडून करून घ्यायची आहे. तसेच कठीण मुद्द्यांचे मार्गदर्शन विषय शिक्षकांकडून मिळवून घ्यावे. ह्या परीक्षेचा हेतू ;विद्यार्थ्यांना काय येत आहे व काय  नाही? हे तपासून जे येत नाही (कठीण अध्ययन निष्पत्ती) ते पुन्हा विद्यार्थ्यांना शिकविण्यात येईल , हा आहे त्यामुळे सर्व पालकांनी आपल्या मुलींची प्रथम सत्राच्या अभ्यासक्रमाची व्यवस्थित तयारी करवून घ्यायची आहे व विषय शिक्षकांकडून मार्गदर्शन घ्यायचे आहे.

Friday, February 19, 2021

कोवीड १९ संदर्भी मानक संचालक प्रक्रिया (Standard Operating Procedure- SOP) बायसेग तालीमचे मुद्दे.

 




















शिवजयंती २०२१ साजरी करतांना शाळा क्र.-२५५ चे समस्त शिक्षक वृंद

    आज दिनांक १९ फेब्रुवारी २०२१ रोजी न.प्रा.शा.क्र.-२५५,नागसेन नगर,पांडेसरा,सुरत येथे शाळा परिवाराने शिवजयंती साजरी केली.त्यात वाली सुद्धा सहभागी झाले.सर्वांनी छत्रपति शिवाजी महाराजांच्या फोटोवर फुलहार अर्पण करुन त्यांना आदरांजली श्रद्धांजली दिली.

'शिवराय मनामनात, शिवजयंती घराघरात.'


कोवीड-१९ महामारीच्या प्रादुर्भावामुळे लोकडाऊन नंतर परिस्थिती पुन्हा पूर्ववत होतांना शालेय प्रत्यक्ष शिक्षणाची सुरुवात करतांना SOP च्या नियमांचे पालन करुन विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्याआधी घेण्यात येणारी काळ्जीचे सादरीकरण