डॉ.सरोजिनी बाबर प्रा.शा.क्र.-२५५ ही नगर प्राथमिक शिक्षण समिति सुरत संचालित शाळा आहे.ही शाळा जुन २००० ह्या वर्षी शाळा क्र.-२२२ मधुन विभाजित करण्यात आली.सध्या ही शाळा नागसेन नगर,पांडेसरा,सुरत येथे कार्यरत आहे.
ह्या शाळेत बालवाडी ते इयता-८ वी पर्यंत वर्ग समाविष्ट आहेत.सध्या शाळेत सुमारे ३५७ विद्यार्थी शिकत आहेत.तसेच १ मुख्यशिक्षक ,९ प्राथमिक शिक्षक व १ बालवाडी शिक्षिका कार्यरत आहेत.
शाळा परिसर खुपच सुंदर.स्वच्छ आणि मोकळे आहे.शाळेच्या आवारात झाड,रोप इत्यादी आहेत ज्यामूळे पर्यावरणाची जोपासनेचे महत्व विद्यार्थ्यांना कळते.शाळेतील इमारत संरचना देखील छान आहे ज्यामुळे वर्ग आणि ओसर्या हवेशीर आणि उजेडदार आहेत.शाळेत अग्नीशामक उपकरणं आहेत तसेच विद्यार्थीनींना नियमित सर्व प्रकारच्या संकट ,दुर्घटना,नैसर्गिक संकटाना तोंड देता यावे यासाठी स्वरक्षणचे प्रशिक्षण दिले जाते.शाळेच्या मुख्य दरवाज्या जवळ आपातकालीन हेल्प लाइन नंबर देण्यात आले आहेत.
शाळेच्या इमारतीत BALA प्रोजेक्ट अंतर्गत भिंतीचित्र काढण्यात आले आहे ज्यामुळे विद्यार्थ्यांना सहज आनंददायी शिक्षण मिळु शकेल.

आपल्या शाळेत विद्यार्थींनीना पोषणयुक्त आहार मिळावा यासाठी मध्याह्न भोजन योजना राबविली जाते.तसेच विद्यार्थांचे स्वास्थ संबधीत काळजी घेण्यात येते.त्यांना जेवण्या आधी हॅण्ड वॉशने हाथ धुण्यासाठी सुचना दिली जाते.पिण्यासाठी आरओ. प्लांटचे पाणी उपलब्ध असते तसेच स्वच्छ टोयलेट बाथरूम उपलब्ध आहेत.








No comments:
Post a Comment