Tuesday, July 13, 2021

मे २०२१ ते जून २०२१ पर्यंतच्या घडामोडी

 १) आपल्या शाळेच्या गौरवात आणखी वाढ ☺-

             


     NMMS परीक्षेत आपल्या शाळेतील इ. ८ वी अ ची विद्यार्थीनी किर्ती सुनिल धकाते हीने १८० गुणांपैकी १२८ गुण प्राप्त करुन मेरीटमध्ये स्थान मिळविले.ह्यामुळे ह्या विद्यार्थीनीस इ. ९ ते १२ पर्यंत दरवर्षी १२०००/- स्कोलरशीप मिळेल अश्या प्रकारे ४ वर्षात एकुण ४८०००/- ची मातबर रक्कम शैक्षणिक सहाय म्हणून प्राप्त होईल.विद्यार्थीनी किर्ती सुनिल धकाते हीस शाळा परिवार तर्फे हार्दिक शुभेच्छा!

२) MICROSOFT TEAMS एप्लीकेशनवर ओनलाईन क्लासचे आयोजन-

शाळा बंद आहे पण शिक्षण नाही! ह्या वाक्याला सार्थक करण्यासाठी आपल्या शाळेतील सर्व शिक्षकांद्वारे नियमित ओनलाईन क्लासचे आयोजन दररोज करण्यात येत आहे. त्यात दररोज मोठ्या संख्येत विद्यार्थी जोइन होतात व ज्ञान प्राप्त करतात.अश्याप्रकारे सर्व वालींनी ओनलाईन क्लासला चांगला प्रतिसाद दिला आहे.जे विद्यार्थी अजुनही ओनलाईन क्लासला जोइन होत नाही त्यांच्या वालींनी देखील आपल्या पाल्यांना ओनलाईन क्लासमध्ये जोइन होण्यास प्रोत्साहन द्यावे.


३)ज्ञानसेतु ब्रिजकॉर्स-

गुजरात सरकार शिक्षण विभागाद्वारे मागच्या शैक्षणिक वर्षाच्या मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या निदान कसोटी वरुन शोधण्यात आलेले कठीण विषयबिंदुंचा पुन्हा सराव व्हावा यासाठी ज्ञानसेतु ब्रिजकोर्सचे आयोजन १०/०६/२०२१ पासुन ते १७/०७/२०२१ पर्यंत करण्यात आले आहे.ह्या कार्यक्रमांचे प्रसारण डी.डी. गिरनार चॅनलवर दररोज वेळापत्रक नुसार वेगवेगळ्या इयत्तेसाठी प्रसारण करण्यात येते तसेच युट्युबच्या लींक द्वारे देखील हे शैक्षणिक कार्यक्रम पाहु शकतो.
ह्या कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांचे मुल्यांकन करण्यासाठी ता-२०/०७/२१ ते २३/०७/२१ दरम्यान एकम कसोटी/सामयिक कसोटी घेण्यात येइल त्यामुळे सर्व वालींनी दररोज हे कार्यक्रम आपल्या पाल्यांना डी.डी. गिरनार चेनलवर दाखवावे.




✔   Gujarat e-Class Samagra Shiksha  ह्या युट्युब चॅनलवर देखील हे व्हीडीयो उपल्ब्ध आहेत. https://www.youtube.com/c/GujaratEclass/videos


४)विश्व वस्ती दिवस साजरा- 

विद्यार्थी वस्तीवाढच्या गंभीर समस्ये विषयी माहितगार होतील ह्या उद्देश्याने आपल्या शाळेत विश्व वस्ती दिवस निमित्ते  निबंध,चित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले ह्या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्साहाने भाग घेतला.














No comments:

Post a Comment